मला शिव्या दिल्या तरी मी आरक्षण दिले; प्रत्येक समाजासाठी कार्य करणं माझं कर्तव्य – फडणवीस

नागपूर, दि.३: – मराठा समाज असो की ओबीसी; महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी कार्य करणं माझं कर्तव्य आहे. मला दोष दिले किंवा शिव्या दिल्या; तरी ते कार्य मी कालही करत होतो, आजही करतोय अन् उद्याही करेन,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा निघाल्यानंतर फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. काही कायदेशीर अडचणी होत्या. त्यांचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेतला. त्याचे श्रेय मंत्रिमंडळ उपसमितीला द्यावे लागेल. राजकारणात टीका सहन करावी लागते. लोक तुमचं स्वागतदेखील करतात. समाजाला न्याय देण्याचे एकच ध्येय समोर होते. न्याय देताना दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत यालाही महत्त्व देण्यात आले. त्यातूनच कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या हिताचा तोडगा काढण्यात आला. त्याचा आनंद आहे. जरांगे यांनी उपोषण सोडले याचाही आनंद आहे, असे ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!