विविध पथकांच्या सलामीने चैतन्य विद्यालयाच्या गणरायाला निरोप
1 min read
ओतूर दि.३:- ओतूर (ता.जुन्नर) ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूरच्या गणरायाला सातव्या दिवशी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ,ढोल ताशांच्या गजरात ,विविध पथकांच्या वैविध्यपूर्ण अशा कलाकृतींनी गणरायाला निरोप देण्यात आला.अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.ढोल पथक, झेंडा पथक, झांज पथक, छावा थीम पथक, लेझीम पथक, विविध वेशभूषा, अधिवासी नृत्य, जोगवा, हवाहवाई पथक, टाळ पथक, पर्यावरण पथक, व्यसनमुक्ती पथक, स्वयंसेवक पथक आदी पथके या मिरवणुकीत सामील झाली होती.ढोल ताशांच्या गजराने ओतूरचा परिसर भक्तीमय झाला होता.
अतिशय शिस्तबद्ध या मिरवणूकने सर्व उपस्थितांची मने जिंकली.या सर्व पथकांना अमित झरेकर, संतोष कांबळे, विशाल चौधरी, राजाराम शिंदे, मिलिंद खेत्री, अजित डांगे, बाळासाहेब साबळे, लक्ष्मण दुडे, संतोष सोनवणे, प्रसन्न तांबे, देवचंद नेहे, हर्षल शितोळे, दिनेश ताठे, अनिल जवरे, अशा गाडेकर, सोनाली माळवे, सोनाली कांबळे,
आशा डुंबरे, साक्षी देशमुख, निर्मला डोंगरे, शिल्पा भालेराव, आसावरी गायकर, वनिता भोर, रसिका शेळके, अश्विनी नलावडे, संस्कृती डुंबरे, सरस्वती भताने, रंजिता पाटील आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.या मिरवणूकीत ग्रामविकास मंडळ ओतूर चे अध्यक्ष अनिल तांबे ,माधवराव डुंबरे, रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे, प्रदीप गाढवे,
पंकज घोलप, सिताराम डुंबरे, अमोल डुंबरे, नितीन तांबे, शांताराम पानसरे, राजश्री भालेकर,संजय हिरे, अनिल उकिरडे, भाऊसाहेब खाडे, अजित डांगे, मंगेश तांबे, सीमा तांबे, शुभदा गाढवे, सविता डुंबरे, पूनम घोलप, मनिषा डुंबरे, अस्मिता डुंबरे, अनुराग फापाळे, प्रशांत डुंबरे, संजय वल्हवणकर, प्रकाश डुंबरे, सचिन तांबे,
आत्माराम जाधव,अनिल डुंबरे, हेमंत पाटील डुंबरे,पांडूरंग ढोबळे, विजय खरात,भगवंता घोडे,योगेश फापाळे,ईश्वर ढमाले, तेजस ढमाले, भाऊसाहेब ठोसर, दिपक हांडे,अरविंद आंबरे, मयूर जाधव व परिसरातील अनेक ग्रामस्थ,पालक सहभागी झाले होते.