रक्तदानाच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी
1 min read
निमगाव सावा दि.३:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शरद सहकारी बँकेचे संचालक, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक पांडुरंग पवार यांचा 67 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त बुधवार दि. 27 ऑगस्ट भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माणिकराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था मोरया ब्लड सेंटर चिंचवड पुणे यांच्या सहकार्याने महाविद्यालयात केले होते. या रक्तदान शिबिरासाठी महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी तसेच गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा
असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार यांनी केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच निमगाव सावा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ अशा एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन निमगाव सावाचे माजी सरपंच इब्राहिम पटेल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी रेशमा बोटकर सरपंच पारगाव, तारा लामखडे माजी सरपंच मंगरूळ, आदर्श उद्योजिका सुरेखा काटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती उपाध्यक्ष कविता पवार, माजी सरपंच सुनीता घोडे,
अनिता घोडे, सुनंदा भापकर, अफसाना पटेल, मनीषा घोडे, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, सचिव परेश घोडे, संचालक दत्तात्रय घोडे, रहेमान पटेल,माजी उपसरपंच नजीर भाई चौगुले, तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम लगड, निवृत्ती गाडगे, विनायक गाडगे, दत्तात्रय मुंजाळ,
संतोष गाडगे, बाळासाहेब गाडगे, धनंजय गाडगे,संग्राम डुकरे महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हवालदार अमोल सुरेश शिंदे संत तुकाराम पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्या सौजन्याने हिवाळी जर्किंन भेट स्वरूपात देण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.