चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी चोरी करताना रंगेहात पकडले; पाठलाग करत ठोकल्या बेड्या
1 min read
बेल्हे दि.२:- आळेफाटा पोलीसांच्या तत्परतेमुळे बँकेत पाळत ठेवून बॅग लेफ्टींग करणारे सराईत आंतर राज्यातील आरोपी चोरी करून पळून जात असताना रंगेहात पकडत ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आळे (ता.जुन्नर) येथील अभिषेक वसंत माळवे हे बँकेत त्यांचे व्यवहाराचे कामानिमित्ताने काळया रंगाची हॅन्ड बॅग घेवून बँकेत गेले होते. बँकेतील आर्थिक व्यवहार संपलेनंतर ते त्यांचे मारूती स्विफ्ट कार नंबर एम.एच १४ जी.ए ३१९३ यामध्ये बसून सदरची हॅन्डबॅग ड्रायव्हर सिटचे शेजारील शिटवर ठेवून
त्यांचे राहते घराचे समोर त्यांचे वाहन पार्किंग करून घरात गेल्याचे आरोपींनी पाहिल्यानंतर आरोपींनी गाडीची काच फोडून गाडीमधील हॅन्ड बॅग चोरी केली होती व याच वेळी आळेफाटा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना आळेफाटा येथील बॅक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या बाहेर त्यांना होंडा शाईन
मोटार सायकल क्रमांक एम.एच १७ सी.ई ०३६३ वरील दोन इसमांच्या हालचाली या संशयीत रित्या वाटत असल्याने त्यांनी सदर इसमांचा पाठलाग करून पकडले असता त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यांनी त्यांची नावे १) गुंजा हनूमंधू वय २२ वर्षे रा. अलीमडगू पो. दामावारम जि. नेलोरे आंध्रप्रदेश,
२) माधव सुंदरम गोगला वय ३८ वर्षे रा. कपरालतीप्पा, बीटरगुंटा ता. कावली जि.नेलोरे आंध्रप्रदेश अशी असल्याचे सांगितले. आरोपींना ताब्यात घेवून त्यांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिकची चौकशी करता त्यांनी गुन्हा केलला असल्याची कबुली दिली आहे.
तसेच आरोपीकडुन होंडा शाईन मोटार सायकल ४० हजार रुपये किंमतीची व गुन्ह्यातील चोरलेली रोख रक्कम २५ हजार रुपये एकूण ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे,
उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थान. गु. शा.चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पो. हवा. विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, भिमा लोंढे, पो.कॉ नविन अरगडे, ओंकार तुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.