गणेश सहकारी दूध संस्थेच्या गवळ्यांना २ रुपये बोनस व १०% लाभांश

1 min read

राजुरी दि.२:- राजुरी (ता.जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन सुभाष पा. औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शासनाने मंजूर केलेले शेतकरी दूध प्रति लिटर 5 व 7 रुपये अनुदान राजुरी डेअरी च्या 100 टक्के गवळ्यांना देण्यात संस्थेला यश आलेले आहे. तसेच १०% लाभांश व २ रुपये प्रति लिटर बोनस दिल्यामुळे सर्वामध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती संस्था चेअरमन सुभाष पा.औटी व व्हाइस चेअरमन दिलीप घंगाळे यांनी दिली. यावेळी विषयपत्रिकेतील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला आहे. यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, संस्था व्हा. चेअरमन दिलीप घंगाळे,माजी चेअरमन बाळासाहेब हाडवळे, गोपाळा औटी, अनंतराव गटकळ, मा. व्हा.चेअरमन एल डी घंगाळे संस्था संचालक मंडळ, शरदचंद्र पतसंस्था चेअरमन एम.डी. घंगाळे, जी.के औटी, वल्लभ शेळके, अविनाश पा. औटी, एकनाथ शिंदे,चंद्रकांत जाधव, अजय कणसे, मुरलीधर औटी, गोरक्ष हाडवळे, संस्था सभासद, सचिव, कर्मचारी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच चालू अहवाल वर्षात शिवाजी रामभाऊ औटी,दत्तात्रय लक्ष्मण डुंबरे,अविनाश सत्यवान हाडवळे, सुधिर लक्ष्मण डुंबरे, महेंद्र जनार्दन औटी या दुध गवळयांनी सर्वात जास्त गाय दुध पुरवठा केला असुन किरण नाथाजी डुंबरे,शिला दिपक हाडवळे, रंजना निवृत्ती औटी, राहुल लक्ष्मण औटी, तृप्ती प्रावील आवटे या दुध गवळयांनी सर्वात जास्त म्हैस दुध पुरवठा केल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सभेला मार्गदर्शन दिपक औटी, प्रिया हाडवळे, यांनी केले व अहवाल वाचन संस्था सचिव निवृत्ती हाडवळे यांनी केले, सूत्रसंचालन गंगाराम औटी यांनी केलेआभार निलेश हाडवळे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!