ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना लोणंदमध्ये धक्काबुक्की

सातारा दि.२: – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना लोणंद येथे शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा निषेध करत अशा प्रकारच्या दांडगाईची आम्हाला सवयच असून,याचा कायमच सामना करावा लागत असल्याने हे नवीन नसल्याचे मत हाके यांनी व्यक्त केले.साताऱ्यातील लोणंद परिसरातील नियोजित कार्यक्रमांसाठी हाके येथे आले होते. त्याच वेळी अचानकपणे काही तरुण दुचाकीवरून आले.त्यांनी हाके यांना दमदाटी करून धक्काबुक्की केली. दरम्यान, हा प्रकार होताच जमाव जमू लागल्यावर तरुण गायब झाले. पोलीसही लगोलग घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हाके यांना सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळी पोहोचवले. भ्याड हल्ल्याचा निषेध दरम्यान, या घटनेचा निषेध करत हाके म्हणाले, की मी माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी लोणंद परिसरात आलो होतो. या वेळी अचानकपणे असा भ्याड हल्ला करत हे टोळके गायब झाले. आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही. फक्त आमचे आरक्षण टिकले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. अशा प्रकारच्या दांडगाईची आम्हाला सवयच असून,याचा कायमच सामना करावा लागतो.हे आमच्यासाठी नवीन नसल्याचे मत हाके यांनी व्यक्त केले. या वेळी नवनाथ शेळके, विकास धायगुडे, नानासाहेब धायगुडे, जयवंत शेळके आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!