जुन्नर तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा दमदार खेळ
1 min read
जुन्नर दि.१:- जुन्नर तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा २०२५-२६ मध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेत शाळेच्या क्रिकेटपटूंनी दाखवलेली जिद्द, शिस्तबद्ध खेळ, संघभावना आणि कौशल्य यामुळे त्यांनी मानाचा तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला. मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.