जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल ची विजयगर्जना

1 min read

पुणे दि.३०:- बालेवाडी आणि विमाननगर, पुणे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी (ता.जुन्नर) येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढविला.विजेते खेळाडू : ११ वर्षाखालील मुले,आर्यन प्रवीण कालेकर – द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल) स्वयम सुभाष खामकर – तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल),अर्जुन काळे – सहभागी खेळाडू
१४ वर्षाखालील मुली, आरोही रोहित काकडे – द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल), १४ वर्षाखालील मुले,शौर्य किशोर काकडे – सहभागी खेळाडूया स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंची विभागीय स्केटिंग स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली असून शाळेच्या यशात भर पडली आहे.मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच शाळेच्या यशस्वी कामगिरीत विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!