समर्थ आय.टी.आय मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणगौरव संपन्न
1 min read
बेल्हे दि.१:- समर्थ रूरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय) नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत व गुणगौरव समारंभ अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्राचार्य शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.प्रास्ताविकामध्ये प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी संस्थेचा परिचय करून देत औद्योगिक क्षेत्रातील प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच शिस्त,मेहनत आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्य घडवावे असे आव्हान केले.उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी
मनोज खेबडे (सीनियर जनरल मॅनेजर मॅक्स ऑटोमॅटिव्ह शॉ टोयोटा) धनश्री गायकवाड (ग्रुप हेड HR) मयूर कुदळे सीनियर ऑफिसर HR) उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनोज खेबडे यांनी सांगितले की, आय. टी.आय हा केवळ अभ्यासक्रम नसून आपल्या भविष्यातील करिअरला दिशा देणारा टप्पा आहे म्हणूनच नियमितता,प्रामाणिकपणा व कौशल्य शिकण्याची उत्सुकता हेच यशाचे खरे गमक आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमत व्यक्त करताना वल्लभ शेळके सर यांनी सांगितले की आय.टी.आय मधून उत्तम तंत्रज्ञान,शिस्त व कष्ट घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे भविष्यातील उद्योग क्षेत्राचे आधारस्तंभ ठरतील.आय. टी. आय मधील विद्यार्थी जीवनाच्या वाटेवरती वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून यश संपादन करत असतो.
नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांमधील उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा हस्ते गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निकेश औटी,विलास सोनवणे,नीलिमा औटी, शेखर साळवे,महेंद्र न्हावी,कविता बांगर,थोरवे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी साबळे यांनी केले तर राजेंद्र पाचपुते यांनी सर्वांचे आभार मानले.