पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन

1 min read

आळे दि.१ (वार्ताहर):- बेल्हे, आणे, राजुरी, मंगरूळ, पारगाव, साकोरी व परिसरातील पाच दिवसांच्या बाप्पाला आनंदात निरोप देण्यात आला. पाच दिवसांच्या घरगुती बाप्पाला साध्या पद्धतीने निरोप देण्यात आला. चालू वर्षी जून, जुलै महिन्यात जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात यंदा थोड्या फार प्रमाणात पाऊस झाल्याने नद्या व ओढ्यांना सर्व भागात पाणी नाही परंतु जेथे थोड्या फार प्रमाणात पाणी मिळेल तिथे भक्तांनी गणेश विसर्जन केले.विसर्जन मिरवणुकीत पुरुषांप्रमाणे, मुले, महिला यांचाही मोठा सहभाग होता.‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशा आवाजाने सर्व परिसर गर्जत होता. आळे येथे भाविकांनी आनंदात पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला. लहानांपासून ते थोरामोठापर्यंत, वयोवृद्धांपर्यंत सर्व मंडळी बाप्पाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!