सह्याद्री व्हॅली येथे गणेश उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

1 min read

राजुरी दि.३१:- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी तसेच सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी येथे गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गीत गायन, सोलो डान्स कॉम्पिटिशन, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा तसेच जादूगार प्रकाश शिरोळे यांचे जादूचे प्रयोग आदींचे आयोजन करण्यात आले होते. वरील सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आनंद लुटला.जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या जादूच्या प्रयोगांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गेले आठ वर्षापासून गणेशोत्सव साजरी करण्याची परंपरा या संस्थेत आहे. यावेळी महारिया चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार सचिन चव्हाण, सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य पी. बालारामडू, सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सचिन डेरे आदी मान्यवर उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कराटे व कुस्ती स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. त्या विद्यार्थ्यांचा व क्रीडा शिक्षक गणेश शिंदे यांचा सन्मान संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्विनी हाडवळे यांनी केले तर सिताराम कणसे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!