दहावीचा निकाल जाहीर; ९२.९ टक्के; यंदाही मुलींची बाजी

1 min read

मुंबई दि.८:- राज्याचा दहावीचा निकाल ९२.९ इतका लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सर्वात कमी निकाल हा छत्रपती संभाजीनगरचा लागला आहे. या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींना बाजी मारली असून ८४. ९६ इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९४.१६ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.६० टक्क्यांनी अधिक आहे. यंदा. १०,०३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत एकूण ४०२ कॉपी प्रकरणे आढळली असून सर्वाधिक ८२ कॉपीची प्रकरणे नाशिक विभागात आढळली आहेत.ऑनलाईन संकेतस्थळांशिवाय तुम्हाला दहावीचा निकाल मोबाईल एसएमएसवर ही पाहता येऊ शकतो. त्यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHSSC Seat Number टाइप करा आणि तो 57766 या क्रमांकावर पाठवा. DigiLocker: digilocker. gov.in वर ‘SSC Result’ सेक्शनमधून तुमची गुणपत्रिका डाउनलोड करू शकता. वेबसाईट चालू नसेल तर: sscresult.mkcl.org किंवा results. targetpublications.org यांसारख्या इतर वेबसाईटचा वापर तुम्ही करु शकता.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकाला बाबतची माहिती दिली. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. 12वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण निकालाचा सर्वात अव्वल लागला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला आहे. छत्रपती संभाजी नगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!