२५ मे रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर भव्य ‘सत्याग्रह’ आंदोलन: बाळासाहेब औटी यांची घोषणा

1 min read

पुणे दि.९:- वस्तूच्या छापील किमतीच्या (MRP) नावाखाली कंपन्यांकडून सुरू असलेली ग्राहकांची उघड लूट थांबवण्यासाठी आणि बाजारव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आता दिल्लीच्या तख्तावर धडक देणार आहे. येत्या २५ मे २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे देशव्यापी ‘सत्याग्रह’ करण्यात येणार असल्याची घोषणा ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब औटी यांनी केली. महाराष्ट्र राज्याची विशेष ऑनलाइन बैठक शुक्रवार दि.८ रोजी पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना औटी बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय कार्यकारी सदस्य तथा प्रांताचे संपर्क अधिकारी सूर्यकांत पाठक, प्रांताचे संघटन मंत्री संदीप जंगम आणि प्रांत सचिव अनिल देशमुख, विलास जगदाळे, ज्ञानेश्वर उंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

काय आहेत प्रमुख मागण्या?

बाळासाहेब औटी यांनी निवेदनात म्हटले आहे की, “आज एमआरपी हा ग्राहकाच्या संरक्षणासाठी नसून कंपन्यांच्या अफाट नफेखोरीचा परवाना झाला आहे. ३० रुपयांच्या औषधावर ३०० रुपये एमआरपी छापून ग्राहकाची कायदेशीर लूट केली जात आहे. आमचा लढा खालील तीन प्रमुख मागण्यांसाठी आहे:”1. प्रत्येक पाकिटावर वस्तूचे ‘उत्पादन मूल्य’ (Cost of Production) छापणे सक्तीचे करा. 2. प्रथम विक्री किंमत स्पष्टपणे नमूद करणे कायदेशीर करावे. 3. औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंवर नफ्याची मर्यादा (Profit Cap) सरकारने निश्चित करावी. 4 एम आर पी ठरवण्यासाठी वाजवी कमाल मर्यादा निश्चित करणारा स्वतंत्र कायदा करावा. 5 एम आर पी संदर्भातील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे.आंदोलनाची रणनीती:
या आंदोलनाचा प्रारंभ म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘एमआरपी जागर मंच’ स्थापन केला जाणार आहे. ग्रामसभेचे ठराव घेऊन तहसीलदाराच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवले जातील .11 मे 2026 रोजी महाराष्ट्र प्रांतातील जिल्हास्तरीय कार्यकर्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतील. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला पाठवले जातील. तसेच, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघात भेटून संसदेत आवाज उठवण्यासाठी निवेदन दिले जाईल. २१ मे पासून महाराष्ट्रातील कार्यकर्ते दिल्लीकडे प्रस्थान करतील आणि २५ मे रोजी जंतर-मंतरवर भव्य सत्याग्रह करून केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री व केंद्रीय अर्थमंत्री, वाणिज्य उद्योग मंत्री यांना मागण्यांचे निवेदन देऊन आग्रह धरतील .’दिशा पुस्तिका’ सोपवली जाईल.

आवाहन:

“ही लढाई केवळ एका संघटनेची नसून प्रत्येक ग्राहकाची आहे. आज एमआरपी ही ग्राहक संरक्षणाची नव्हे तर ग्राहक शोषणाचे साधन बनत चालली आहे. सामान्य ग्राहकांना वस्तूची खरी किंमत समजत नाही, त्यामुळे तो फसला जातो. सरकारने तात्काळ ठोस कायदा करून ग्राहकांना न्याय द्यावा” असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे मा राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक एमआरपीची आंदोलन देशव्यापी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून शंभर कार्यकर्ते दिल्ली येथील जंतर मंतरवर होणाऱ्या सत्याग्रह आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!