ज्ञान, संशोधन आणि सतत शिक्षण यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करता येते:- डॉ. शिवाजी पोखरकर

1 min read

माळवाडी (बोटा) दि.८:- श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी माळवाडी (बोटा) ता.संगमनेर येथील प्राध्यापिका डॉ. अक्षदा सूर्यवंशी यांना भगवंत युनिव्हर्सिटी (अजमेर) येथून फार्मसी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.डॉ. अक्षदा सूर्यवंशी यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी पोखरकर तसेच सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना डॉ. शिवाजी पोखरकर यांनी “ज्ञान, संशोधन आणि सतत शिक्षण यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करता येते,” असे सांगत सर्व प्राध्यापकांना उच्च शिक्षण व संशोधनासाठी प्रेरित केले. तसेच त्यांनी डॉ. अक्षदा सूर्यवंशी यांच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!