निमगाव सावात २२० KV चे नवीन पवार हाऊस व उपविभागीय कार्यालय उभारा:- पांडुरंग पवार

1 min read

बेल्हे दि.३०:- निमगाव सावा येथे महावितरणाचे उपविभागीय कार्यालय तसेच 220 KV चे नवीन पावर हाऊस उभारावे अशी विनंती पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अध्यक्ष जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पांडुरंग पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पांडुरंग पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निमगावसावा (ता.जुन्नर) हे राज्यमार्ग क्र. ११२ व प्रजिमा जिल्हा मार्ग ९ वर वसलेले जुन्नर, आंबेगांव, शिरुर व पारनेर या तालुक्यांना सीमावर्ती, मध्यवर्ती असणारे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. या परिसरात शिरोली तर्फे आळे, खोडद, रांजणी, पिंपरखेड, पारगांव तर्फे आळे, बेल्हे, आणे, पळसपुर, झापवाडी आदि ३३/११ KV ची पॉवर हाऊस कार्यान्वित आहेत. या सर्व केंद्राना निमगांवसावा हे गांव मध्यवर्ती आहे. २२० KV पॉवर हाऊस आवश्यक असणारी १० एकर जागा देणे बाबत ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे. हे पॉवर हाऊस झाल्यास ४ तालुक्यातील सुमारे ४० ते ५० गांवातील ग्राहकांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच येथील विदयुत ग्राहकांना नारायणगांव अथवा ओतुर (आळेफाटा) महावितरणच्या कार्यालयात जावे लागते हे अंतर नारायणगांव २५ कि.मी. व ओतुर ४० कि.मी. अंतरावर यामुळे ग्राहकांना याची अडचण घेत आहे. निमगांवसावा येथे उपविभागीय कार्यालय झाल्यास या परिसरातील सुमारे २५ ते ३० गावातील विदयुत ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. तरी याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश सबंधितांना दयावेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!