गुळंचवाडीत वनविभागाने लावला पिंजरा
1 min read
बेल्हे दि.३०:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गुळुंचवाडी येथील घोडके वस्तीवर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांत बिबट्याने एकाच घरात दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याने येथे वनविभागाने पिंजरा लावला आहे.
सागर जाधव यांच्या गट नंबर १४६ मध्ये पिंजरा लावला असल्याची माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली. सागर जाधव यांच्या बंगल्याच्या ७ फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत येऊन दोन वेळा हल्ला केला होता. यापूर्वी झालेल्या हल्ल्यात त्यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता,
ज्यात तो गंभीर जखमी झाला होता.सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. सदर ठिकाणी पुन्हा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभागाने तात्काळ या घटनेची दखल घेतली व पिंजरा लावला. सदर ठिकाणी वन विभागाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
