समर्थच्या २१ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
1 min read
बेल्हे दि.३०:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज,बांगरवाडी बेल्हे आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकतीच समर्थ स्पोर्ट्स अकॅडमी येथे संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन समर्थ शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष माऊली शेळके यांच्या शुभहस्ते ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,
जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष गणेश राऊत, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई आहेर,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,डॉ.शरद पारखे उपस्थित होते.सदर स्पर्धेसाठी जुन्नर तालुक्यातून ३४० खेळाडू विविध शाळांतून सहभागी झाले होते.समर्थ गुरुकुल व समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या २१ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती गुरुकुल चे प्राचार्य
सतीश कुऱ्हे व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.समर्थ कुस्ती केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांचे वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.विद्यार्थ्यांना वेगवेगळे कुस्तीचे डावपेच शिकविले जातात.
कुस्तीमुळे आपले शरीर सुदृढ होते.सुदृढ शरीर आणि निरामय आरोग्य हेच यशाचे गमक असल्याचे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
जिल्हास्तरासाठी निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:-
१४ वर्षे वयोगट (मुले): ३८ किलो वजनी गट- प्रथम क्रमांक-
प्रणव गाजरे (समर्थ गुरुकुल,बेल्हे) ४१ किलो वजनी गट-
प्रथम क्रमांक- पियुष चिकणे (समर्थ गुरुकुल,बेल्हे)
६२ किलो वजनी गट- प्रथम क्रमांक- आर्यन दाते (समर्थ गुरुकुल, बेल्हे) ७५ किलो वजनी गट- प्रथम क्रमांक-
धनंजय बेलकर (समर्थ गुरुकुल,बेल्हे)
१७ वर्षे वयोगट मुले:- ४८ किलो वजनी गट- प्रथम क्रमांक-
श्लोक काळे (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) ५१ किलो वजनी गट- प्रथम क्रमांक- सुरज डुकरे (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) द्वितीय क्रमांक- ऋतिक फलके (समर्थ ज्युनियर कॉलेज,बेल्हे) ५५ किलो वजनी गट प्रथम क्रमांक साहिल येवले (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) १७ वर्षे वयोगट मुली
४९ किलो वजनी गट प्रथम क्रमांक जानवी नलावडे (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) ६५ किलो वजनी गट प्रथम क्रमांक
तन्वी जाधव (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) १९ वर्षे वयोगट मुले ६५ किलो वजनी गट प्रथम क्रमांक राम दांगट (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) ७० किलो वजनी गट प्रथम क्रमांक
दर्शन भापकर (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे)
७४ किलो वजनी गट, प्रथम क्रमांक करण बांगर (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) ७९ किलो वजनी गट प्रथम क्रमांक
वेदांत घाडगे (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) ८६ किलो वजनी गट प्रथम क्रमांक फैजान शेख (समर्थ ज्युनियर कॉलेज,बेल्हे)
१२५ किलो वजनी गट प्रथम क्रमांक जीवन बांगर (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) १९ वर्षे वयोगट मुली मुली ५९ किलो वजनी गट प्रथम क्रमांक वैष्णवी गायके (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे)
६२ किलो वजनी गट प्रथम क्रमांक अलिशा शेख (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) ६५ किलो वजनी गट प्रथम क्रमांक
दीक्षा घाडगे (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) ७६ किलो वजनी गट प्रथम क्रमांक समृद्धी जाधव (समर्थ ज्युनियर कॉलेज,बेल्हे) ग्रीको रोमन १९ वर्षे वयोगट मुले ७७ किलो वजनी गट प्रथम क्रमांक श्रेयश आवारी (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे)
८७ किलो वजनी गट प्रथम क्रमांक विघ्नेश पवार (समर्थ ज्युनियर कॉलेज ,बेल्हे) स्पर्धेमध्ये पंच म्हणून एच पी नरसुडे,सुरेश काकडे,गणेश जाधव,विनायक वऱ्हाडी,राहुल अहिरे जयवंत गाडे, अजय कानडे यांनी काम पाहिले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी तर आभार सुरेश काकडे यांनी मानले.
