तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचा डंका

1 min read

लाखनगाव दि.३०:- जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आंबेगाव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मंचर येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत एन. सी. आर. डी. शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव विद्यालयाचे 12 विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यापैकी 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 14 वर्ष मुले 38 kg वजनगट यश संजय रोडे – प्रथम क्रमांक, 14 वर्ष मुली, 42kg वजनगट गायत्री बाबाजी बरकले – प्रथम क्रमांक17 वर्ष मुली,
40kg वजनगट तंजीला अन्सार चौगुले – प्रथम क्रमांक,52 kg वजनगट – कार्तिकी गणेश दळे – प्रथम क्रमांक. 46 kg वजनगट – कावेरी ससंतोष मुलमुले – प्रथम क्रमांक 43 kg वजनगट छाया गंगाराम कर्हे – द्वितीय क्रमांक. 57 kg श्रेया प्रकाश करकुड – द्वितीय क्रमांक17 वर्ष मुले
51kg वजनगट सिद्धार्थ गोरक्ष दळे – द्वितीय क्रमांक 55 kg वजनगट, कृष्णा संजय काळे तृतीय क्रमांक 75 kg वजनगट – समर्थ जयदिप गावडे – द्वितीय क्रमांक 51 kg वजनगट, सिद्धार्थ फकीरा धरम – तृतीय क्रमांक वरील पैकी यश रोडे, गायत्री बरकले, तंजीला चौगुले, कार्तिकी दळे, कावेरी मुलमुले या पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक प्रवीण शिकारे व विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल देसले सर यांचे लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल एन. सी. आर. डी शिक्षण संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अमरजीत खराडे तसेच शाळा व्यवस्थापन व इतर समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक प्रविण शिकारे यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!