आळे येथील भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या नागरिकांसाठी रविवारी दाखले वाटप शिबीर

1 min read

आळे दि.३०:- गावातील सर्व भटक्या जाती व जमातीच्या नागरिकांना महसूल विभागा- मार्फत कळविण्यात येते कि, शासकीय योजनांचा लाभदेण्यासाठी शिबिराचे आयोजन रविवार दि.३१/०८/२०२५ रोजी मौजे आळे (ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये करण्यात आले आहे. तरी सर्व भटक्या जाती, जमातीच्या नागरिकांनी/प्रतिनिधींनी शिबिरासाठी उपस्थित राहावे तसेच ज्यांना दाखले काढायचे असतील त्यांनी सर्व कागद पत्रासह उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे. यासाठी सन १९६१ सालचा पुरावा जुन्नर तालुक्यातील आवश्यक आहे.जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१) दाखला आवश्यक व्यक्तीचे बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा पुरावा २) दाखला आवश्यक व्यक्तीच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा पुरावा ३). अ) Maratha SEBC / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा.ब) VJNT करिता १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा.
क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा. (वडील/आजोबा/चुलते/आत्या अथवा वडीलांच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईक यांचा शाळा सोडलेचा दाखला.) ४.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही एक महसुली पुरावा ५. अर्जदार यांचे आधारकार्ड ६.शिधापत्रिका
७. अर्जदार यांचा एक फोटो.तसेच रास्त भाव दुकानदार येथे ही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रेशन कार्ड बाबत कामकाज करण्यासाठी सदर ठिकाणी उपस्थित राहावे.असे आवाहन तहसीलदार जुन्नर यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!