भविष्यात दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील:- डॉ.उमेश कुंभार

1 min read

राजुरी दि.३०:- दुग्ध व्यवसाय करताना गाईंची योग्य पद्धतीने निगा राखून प्रोटीनियुक्त खाद्य दिल्यास दूध उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते त्यामुळेच भविष्यात दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येऊ शकतात. असे मत डॉ.उमेश कुंभार यांनी राजुरी येथे व्यक्त केले.राजुरी (ता.जुन्नर) येथील संत मुक्ता माता सभागृह दक्षिण विभाग येथे गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्था, गणेश मेडिकल, एम.एस.डी.इंटरवेट इंडियाप्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे कुंभार म्हणाले जुन्नर तालुक्यात शेती व्यवसायाला पूरक दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या गाईंना होणाऱ्या नवजात कालवडींचे संगोपन योग्य रीतीने झालेतर कमी काळात त्या कालवडीचे गाईत रूपांतर होते.तीच आपली स्थावर मालमत्ता म्हणून पुढील काळात दुग्ध व्यवसायात चांगले उत्पन्न मिळून देते.म्हणूनच कालवडींचे योग्यरितीने संगोपन झाले पाहिजे असे मत डॉ.कुंभार यांनी व्यक्त केले. यावेळी गणेश सहकारी दूध संस्थेचे चेअरमन सुभाष औटी, व्हाइस चेअरमन दिलीप घंगाळे,गोविंद औटी,बाळासाहेब हाडवळे,तुकाराम डुंबरे,अमर ऐतलवार, रोहित हंगे,जयंत गोरे, साईनाथ हाडवळे, रंगनाथ औटी, सुप्रिया औटी, विक्रम डुंबरे, संजय औटी, निलेश हाडवळे, डॉ.संजय देवकर, डॉ.जब्बार शेख, डॉ.योगेश औटी, डॉ. श्रीधर बढे, प्रकाश वामन यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन हाडवळे यांनी केले.सूत्रसंचालन गंगाराम औटी यांनी केले तर आभार निवृत्ती हाडवळे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!