राज्यभरात 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं; शोधमोहीम सुरू;पुन्हा ई- केवायसी पद्धतीने पडताळणी

1 min read

मुंबई दि.२५:- राज्यभरात 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन महत्त्वाच्या मंत्र्यासोबतच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्हयात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र ‘लाडक्या बहिणीं’ची पुन्हा ई- केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यावरच भाष्य करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभघेतला आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रविवारी नागपूरमधील सातनवरी येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये सुमारे 26 लाख महिलांनी या योजनेचा गैरवापर केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता फडणवीस म्हणाले की, “या प्रकरणात सरकारकडून चौकशी सुरू आहे. जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभघेत आहेत, त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.”

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!