लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राज मुकुटात

1 min read

मुंबई दि.२५:- कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या लालबागच्या राजाची २०२५ ची पहिली झलक समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, यंदा लालबागच्या राजाचा राजेशाही थाट पाहून भाविक भारावून गेले आहेत.दरवर्षी लालबागच्या राजाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून देशभरातून कोट्यावधी भाविक लालबाग परिसरात दाखल होत असतात. नुकतेच 2025 मधील लालबागच्या राजाची झलक पाहायला मिळाली आहे. गणेशोत्सव सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत, आज लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन झालं आहे. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहाण्यासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. यावेळी लालबागच्या राजाचा मुकुट हा आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पाऊलं ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पहायला मिळतोय. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फूटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. लालबागच्या राजाचं हे फोटो सेशनसाठी होणारं पहिलं दर्शन लेझर लाईट्समुळे आणखीनच विलोभनीय झालं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!