देशात ऑनलाइन गेमिंगवर बंदी येणार;विधेयक संसदेसमोर सादर

1 min read

नवीदिल्ली दि.२१:- ऑनलाईन गेमिंग चालवून लाखो लोकांना गंडवणाऱ्या या प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी खासदार डाँ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी विशेष विधेयक पारित करावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यश आले आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक संसदेसमोर सादर केले आहे.त्यामुळं हे विधेयक पारित झाल्यानंतर निश्चितपणे ऑनलाईन गेमिंगला लगाम लागणार आहे.अलीकडच्या काळात ऑनलाईन गेमिंग हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशभरातील लाखो तरुणांना या गेममध्ये ओढून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. ऑनलाईन रमी, लुडो असे अनेक खेळ सुरु करून मोठी आर्थिक उलाढाल केली जात आहे.या आर्थिक उलाढालीतून आंतरराष्ट्रीय दहशतवादालाही काही कंपन्या मदत करत असल्याचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेच्या सभागृहात निदर्शनास आणून दिले होते. एवढेच नाही तर ऑनलाईन गेमिंगमुळे आर्थिक लूट झालेल्या अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवाय लाखो तरुणांना ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाधीन करणाऱ्या या प्रकाराला आळा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः लक्ष घालून एक विशेष विधेयक पारित करावे आणि ऑनलाईन गेमिंगचा प्रकार कायमचा बंद करावा अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली होती.अखेर खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या मागणीला यश आले असून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑनलाइन गेमिंग वर बंदी घालणारे विधेयकच संसदीय समोर सादर केले. केंद्र सरकारने आज लोकसभेत ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयकही मांडले. 19 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाने ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली.यामध्ये, ऑनलाइन पैसे कमावण्यासाठी, जाहिरातीसाठी, खेळण्यासाठी भडकावणाऱ्या कोणालाही दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाधीन अडकलेल्या आणि अडकणाऱ्या नागरिकांसाठीही हे विधेयक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, विधेयक सादर केल्याबद्दल खा. डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!