शरदचंद्र पवार कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १३ विद्यार्थ्यांची निवड

1 min read

ओतूर दि.२१:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनिअरींग ओतुरमध्ये मंगळवार दि.१९ रोजी क्युस्पायडर या कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.या इंटरव्हयूसाठी मिस अशिथा व मिस ऐश्वर्या ( एच आर क्यु स्पायडर पुणे ) उपस्थित होत्या.त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थांची निवड प्रथमतः अॅप्टीट्युड टेस्टमध्ये संगणकावर ऑनलाईन परिक्षा घेऊन त्यामधुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप डिस्कशनद्वारे नंतर वैयक्तीक टेक्निकल मुलाखतीच्या आधारे संगणक विभागामधुन कुमारी धनश्री अजय कांबळे, विवेक अशोक सोनोने, सिद्धनाथ पडवळ, कृष्णा बाबासाहेब धात्रंगे, हेमश्री मधुकर महाले, निकीता संतोष कर्डिले, साक्षी हलवाई, जन्मय अशोक गर्जे, आयुष शांताराम पोटे, अनुजा प्रकाश गोसावी तर इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड टेलीकम्युनिकेशन्स विभागामधुन रोहित राजेंद्र डुंबरे, सुमय्या शेख, साक्षी रामदास जऱ्हाड अशा एकुण १३ विद्यार्थांची निवड केली. निवड झालेल्या विदयार्थ्यांना कंपनीतर्फे ऑफर लेटर देण्यात आली. या इंटरव्हयूचे आयोजन महाविदयालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. राहुल बनसोडे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात यांच्या मार्गर्शनाखाली केले. यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा राहुल बनसोडे,संगणक विभागप्रमुख डॉ सुनिल खताळ,इलेक्टॉनिक्स अँन्ड टेलीकम्युनिकेशन्स विभागप्रमुख प्रा निता बानखेले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा सचिन जाधव, एआयएमएल विभागप्रमुख डॉ पुजा घोलप, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!