डिंभे धरण भरले; मोठा विसर्ग सुरू ९८
1 min read
डिंभे दि.२१:- आंबेगाव तालीक्यातील हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या (डिंभे धरणाच्या) पाणलोट शेत्रात गेले काही दिवस चाललेल्या संततधार पावसामुळे पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) पूर्ण क्षमतेने (९८ टक्के) भरले आहे.
धरणाच्या पाणलोट शेत्रात अजूनही सततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. २०९२० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा हा सह्याद्री पर्वत रांगांचा असल्याने डोगंरच्या आच्छादनाखाली तसेच समुद्र सपाटीपासून उंच भाग असल्याने
याठिकाणी पावसाचे प्रमाण इत्तर प्रमाणापेक्षा जास्त आहे. भीमाशंकर अभयारण्य परिसरात व आंबेगाव तालुक्याच्या पच्छिम आदिवासी भागामध्ये गेले चार दिवस चाललेल्या संततधार पावसामुळे सर्व ओढे, नदी, नाले ओसंडून वाहत असून त्यामुळे डिंभे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पुणे व अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या हुतात्मा बाबू गेनू जलाशयाची (डिंभे धरणाची) पाणीसाठ्याची एकूण क्षमता १३.५० टी.एम. सी. इतकी असून त्यापैकी उपयुक्त विसर्गात टप्प्या टप्प्याने वाढ होणार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर होत असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याची पातळीत जास्तच वाढ होत आल्याचे पाहून.
सावधतेचा उपाय म्हणून ६ वाजता धरणाचे दरवाजे उघडले असून २०९२० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात टप्या-टप्यात वाढ करण्यात येईल.धरण पाणलोट क्षेत्रात जर असाच पाऊस पडत राहिला तर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरेल.
धरणाच्या पाणलोट शेत्रात अजूनही संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचे पाणी ओढे व नाल्यांच्या माध्यमातून डिंभे धरणात जमा होत आहे. धरण जवळपास धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असल्यामुळे आंबेगाव तालुक्याला वरदान असलेल्या
बाबू गेनू जलाशय हे बळीराजच्या एक वरदानच ठरणार आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टा हा डोंगर दऱ्यांनी वेढला असून या ठिकाणी आदिवासी बांधव प्रामुख्याने भात पीक हे घेत असतो दमदार पावसाने भात पीक तरारले आहे.
