अभिमानास्पद! जुन्नर तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड
1 min read
जुन्नर दि.२१:- जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आठ विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासा या प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्थांच्या शैक्षणिक भेटीसाठी निवड झाली आहे.यामध्ये एका विद्यार्थ्याची नासासाठी, तर सात विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी निवड झाली असून.
आणखी तीन विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. पुणे जिल्हा शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.या शैक्षणिक उपक्रमांतर्गत इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांत निवड चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
अंतिम फेरीस पात्र ठरलेल्या २३५ विद्यार्थ्यांची अंतिम चाचणी आयुका संस्थेमार्फत ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घेण्यात आली. यामधून ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये २५ विद्यार्थ्यांना नासासाठी आणि ५० विद्यार्थ्यांना इस्रो भेटीसाठी निश्चित करण्यात आले.
झालेले जुन्नर तालुक्यातून निवड विद्यार्थीः साईराज गोविंद पवार, आळेफाटा, ध्रुव बबन खोकराळे, हिवरे तर्फे नारायणगाव, प्रणव गोरक्षनाथ कडाळे, ठाकरवाडी तेजुर, ऋतुजा अशोक जमादार, गोळेगाव, अन्वित संदीप ताजणे, आळेफाटा, डावखर कृष्णा तुषार, शिरोली बोरी, रीनाज गुलमुस्तफा,
पिंजारी आळेफाटा, श्रावणी सूर्यकांत सुपे, राजुर नंबर १ : प्रतीक्षा यादीतील सार्थक विजय मुळे, मांजरवाडी, चैतन्य अशोक गुळवे, मांजरवाडी, भावना दालचंद प्रजापती, आळेफाटा. विद्यार्थी या निवडीमुळे जुन्नर तालुक्याचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला असून, या संधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अंतराळ संशोधनाची गोडी निर्माण होणार असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
