जुन्नर तालुक्यात वादळी वारा व पाऊस; बोरी – बेल्हे रस्ता रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद

1 min read

आळेफाटा दि.४:- जुन्नर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये वादळाचा मोठा फटका बसत आहे. जुन्नर तालुक्यात च्या पूर्व भागातील बोरी बुद्रुक ते बेल्हे रोडवर झाड वाढल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बऱ्याच ठिकाणी झाडे पडले असून शेतातली उभी पीक पडल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.या पावसाने व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर बेल्हे – बोरी रस्ता बंद झाल्याने प्रवाशांनी व वाहनधारकांनी इतर मार्गाचा वापर करावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे