कांदा अनुदानाच्या अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा

1 min read

मुंबई दि.२१:- सरकारकडून कांदा अनुदानाच्या अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पणन संचालक कार्यालयाने मुदतवाढ देण्याचे आदेश नुकतेच जारी केले. शेतकऱ्यांना ही शेवटची संधी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कांदा अनुदान याेजनेचा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज भरुन द्यावा लागणार आहे.काेणीही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यंदा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्यांमध्ये, पणन अथवा नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. कांदा अनुदानासाठी आजमितीला अहमदनगर जिल्ह्यातील ७५ हजार ३२५ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे