‘चिया’ मधून शेतकऱ्याने मिळवला २ लाखांचा नफा

1 min read

बेल्हे दि.२४- जाधववाडी येथील एका शेतकऱ्याने ‘चिया’ या औषधी वनस्पती चे पिक उत्तम प्रकारे घेतले असुन यामधुन त्यांना खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचा फायदा झाला आहे. सध्याच्या काळात शेतकरी या पारंपारिक पध्दतीने शेती शेती करण्याबरोबरच आयुर्वेदिक शेती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी हा औषधी शेती करण्याकडे वाटचाल करु लागला आहे. यामधील ‘चिया’ नावाची औषधी वनस्पती त्यातीलच एक पिंक असुन याचा उपयोग मानवी शरीरास अन्न पचणास होतो.

तसेच शररीरातील‌ स्नायुंची वाढ होवुन कर्करोग व हृदय विकारांचा धोका कमी असतो व यामध्ये ॲटीऑक्सीडे़ट गुणधर्म असल्याने यास परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असुन विशेष करून हे औषधी वनस्पतींचे पिक अमेरीका या देशात जास्त प्रमाणात घेतले जाते.
पुणे जिल्ह्यात जाधववाडी (ता.जुन्नर) येथील लक्ष्मण गेनभाऊ जाधव यांनी सर्वात पहील्यांदाच हे पिक घेतले असुन‌ स्वता फक्त सातवी शिक्षण असुन सुद्धा त्यांनी अतीशय अभ्यास पुर्वक हे औषधी वनस्पती चे पिक घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांणी ऊस तुटुन गेल्यानंतर खोडव्या मध्ये आंतरपीक घेतले आहे. यासाठी त्यांनी सुरवातीला पुणे या ठिकाणाहुन दोन हजार रुपये किलो प्रमाणे १ किलो चिया चे बियाणे आणुन कांद्याची बियाणे ज्या प्रमाणे टाकतो त्याच प्रमाणे ऊसाच्या अर्धा एकर क्षेत्रात जियाचे बियाणे हाताने फोकले व त्यावर दाताळाने हलवुन घेतले व यास पाणी सोडले‌.

जाधव यांनी या पिकाला गोमृत फवारणी एकदा केली व डि.कंपोझर पाण्यातुन सोडले.व यासाठी त्यांना फक्त १५ हजार रूपये खर्च आला असुन साधारपणे हे पिक शंभर ते एकशे दहा दिवसांमध्ये या पिकाची कापणी करून हाताने मळावे लागते व यामधुन चियाचे बि निघते व बियांची औषध बनवण्यासाठी वापर केला जातो. जाधव यांणी सुमारे पाच पोती (५०० किलो चिया) चे उत्पादन घेतले असुन पुणे येथील एका कंपनीने त्यांच्याशी याबाबत करार करार केला होता त्यांणी ५०० रुपये किलो हमीभाव देऊन विकलेले सुध्दा आहे. जाधव यांणा यामधुन खर्च वजा जाता जवळपास २ लाख रुपयांचा फायदा झाला आहे.

लागवड कशी करावी या पिकाची लागवडी साठी मध्यम बागायती काळीभोर जमीन लागते,यांची पेरणी कांद्याच्या बियाणाप्रमाणे पेरणी करावी लागते तसेच दोन ओळींतील अंतर चार फुटांचे असावे व यास पाणी ठिबक पद्धतीने किंवा ओळीतुन ही सोडले तरी चालेल. जाधव यांनी ऊसाच्या आंतर पिकात गहू,हरभरा,उडीद ही पिके घेण्याबरोबर तुळस तसेच इतर औषधी वनस्पतींची देखील लागवडी केलेल्या आहेत.

“चिया हे औषधी वनस्पती असुन ति विशेष करून अमेरिका या देशात घेतली जाते.गेल्या वर्षी मोशी या ठिकाणी झालेल्या कृषी प्रदर्शनात हि वनस्पती पहावयास मिळाली त्यानंतर तीची संपूर्ण माहीती घेऊन बियाणे घेण्यापासुन तर त्याची संगोपन तसेच काढणी व त्याची विक्री कुठे होती याबाबतची माहिती घेतली.या पिकाला एकरी फक्त १५ हजार रुपये खर्च येत असतो.व औषधी वनस्पती असल्याने कंपणीवाले शेतावरच येऊन घेऊन जात आहे. चालु वर्षी अमेरीका या देशात या पिकासाठी लागणारे वातावरण दुषित झाल्याने उत्पादन कमी निघाले असुन मागणी जास्त असल्याने बाजारभावात वाढ झालेली असुन या बियाणाला ५०० रुपये किलो प्रमाणे उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.तसेच मध्यप्रदेश या राज्यात आपण स्वता मार्केट मध्ये जाऊन विकले तर एक हजार रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळत आहे”.

लक्ष्मण जाधव, शेतकरी जाधववाडी

बाजारभाव
२०२० – २०० रुपये किलो
२०२१ – २३० रुपये किलो
२०२२ – ३०० रुपये किलो
२०२३ – ५०० रुपये किलो

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे