स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यानिकेतन पी.एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पोस्टर स्पर्धा
1 min read
साकोरी दि.१३:- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज साकोरी, (ता. जुन्नर) येथे नुकतेच पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ५वी ते १२ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.या स्पर्धेसाठी वयोगटानुसार विशेष विषय निश्चित करण्यात आले होते.
५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “भारतातील विविधतेत एकता”, ८ वी ते १० वीसाठी “भारतीय स्वातंत्र्याचा संघर्ष, तर ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “डिजिटल इंडिया”, “पर्यावरणीय परिसंस्था” आणि “मानवी विज्ञान” हे विषय देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी कल्पक मांडणी, रंगसंगती आणि विषयाशी सुसंगतता दाखवत उत्कृष्ट सादरीकरण केले.
प्रत्येक वर्गातून एक ते तीन क्रमांक निवडण्यात आले.या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे उपस्थित होते. तसेच प्राचार्य रमेश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सर्व वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत, त्यांचे मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून शेख इम्रान, पाटे शुभम, आणि जगताप राजू यांनी यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, घुले कैलास, साळवे अमितकुमार, लबडे गौरव,गाडगे छाया, खर्डे ऋतुजा, डोके तेजल, खोकराळे अमृता, येवले नयना यांनी विद्यार्थ्यांना सहभागासाठी उत्तेजन देत सुंदर मार्गदर्शन केले. सर्वाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे पोस्टर स्पर्धा अत्यंत रंगतदार, प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरली.
