वडगाव कांदळी च्या सरपंच उल्का पाचपुते यांना ‘ दैनिक प्रभात’ चा आदर्श सरपंच पुरस्कार

1 min read

जुन्नर दि.१४:- वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते यांना आदर्श सरपंच २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आयोजित शानदार कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व उद्योगपती पुनीत बालन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गावच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याची माहिती प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांनी दिली. तीन वर्षात बारा कोटीपेक्षा जास्त निधीतून विकास कामे गावात केली. जलजीवन, आरोग्य, सौरऊर्जा, शिक्षण, रस्त्यांच्या विकास कामातून गाव सुजलाम सुफलाम केले. गाव विकासाचा हा आदर्श निर्माण करणाऱ्या महिलेला हा पुरस्कार देताना समाधान होत असल्याचे प्रभात ग्रुपचे अध्यक्ष हर्षल गांधी यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच उल्काताई श्रीकांत पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर, माजी सरपंच रामदास पवार, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा मुटके, संगीता भोर, शुभांगी निलख, सुजाता लांडगे, ग्रामसेवक आर. आर. इनामदार, सोसायटीचे संचालक पाटीलबुवा भोर, तुषार पाचपुते, जयसिंग भोर, रोहन पाचपुते, कृष्णा भोर, अनिकेत पाटे, ज्योती भोर उपस्थित होते.उल्काताई पाचपुते यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केल्याने सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!