आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते यांना ‘ दैनिक प्रभात’ चा आदर्श सरपंच पुरस्कार
1 min read
आणे :- आणे (ता. जुन्नर) येथील सरपंच प्रियंका प्रशांत दाते यांना दैनिक प्रभात आदर्श सरपंच २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आयोजित शानदार कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व उद्योगपती पुनीत बालन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
गावच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याची माहिती प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांनी दिली.तीन वर्षात बारा कोटीपेक्षा जास्त निधीतून विकास कामे गावात केली. पाणीदार आणे पठार, जलजीवन, आरोग्य, सौरऊर्जा, शिक्षण,
रस्त्यांच्या विकास कामातून गाव सुजलाम सुफलाम केले. गाव विकासाचा हा आदर्श निर्माण करणाऱ्या महिलेला हा पुरस्कार देताना समाधान होत असल्याचे प्रभात ग्रुपचे अध्यक्ष हर्षल गांधी यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच प्रियंका दाते, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, अँड. संतोष आहेर,
उदयोजक विवेक आहेर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.किसन कांबळे, मोहन घोरपडे, रामदास दाते उपस्थिती होते. दाते यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केल्याने सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
