मोहटादेवी गडाचा घाट रस्ता २५ ऑगस्टपर्यंत बंद
1 min read
पाथर्डी दि.१३:- श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावरील घाट रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, हा रस्ता २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, मोहटे यांनी ही माहिती देताना,
विशेषतः वयोवृद्ध, अपंग आणि आजारी भाविकांना या कालावधीत दर्शनाचे नियोजन करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.ट्रस्टने स्पष्ट केले आहे की, भाविकांची वाहने केवळ भक्तनिवासापर्यंतच येऊ शकतील.
त्यानंतर गडावरील देवीच्या दर्शनासाठी भाविकांना पायी प्रवास करावा लागेल. या तात्पुरत्या असुविधेमुळे भाविकांना होणारा त्रास दीर्घकालीन सोयी-सुविधांसाठी आहे, असे ट्रस्टने नमूद केले आहे.
