भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी रोमहर्षक विजय
1 min read
लंडन दि.४:- भारताने पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवत इंग्लंडच्या तोंडचा घास हिरावला आहे. अतिशय अटीतटीच्या सामन्यात भारताने हा सामना रोमांचकरित्या जिंकला व समस्त भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा व मोहंमद सिराज विजयाचे शिल्पकार ठरले.
