राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र; निलेश लंकेंचा गंभीर आरोप

1 min read

अहिल्यानगर दि.४:- सध्या नगर शहरातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला. यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गडद सावट पसरले असून, नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत असल्याचे लंके यांनी पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी एका खोट्या बलात्कार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आता माजी मंत्री व युवा सेनेचे उपनेते विक्रम राठोड यांच्यावरही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत संशयास्पद आहे. फिर्यादी व्यक्तीचा संबंध सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी असल्याचे खासदार लंके यांचे म्हणणे आहे.यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक योगीराज गाडे, प्रदीप परदेशी, युवा सेनेचे प्रशांत भाले, शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, दीपक भोसले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नलिनी गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!