डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा तुमच्या EMI वर होणार परिणाम; व्याजदर वाढणार की कमी होणार ?
1 min read
मुंबई दि.४:- नवीन आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनेटरी पॉलिसी कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून 6 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या बैठकीत व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून RBI ने तीन टप्प्यांत रेपो रेटमध्ये एकूण 1 टक्का कपात केली आहे.
आता हे पाहण्याची वेळ आहे की त्या कपातीतून अर्थव्यवस्थेला नेमका काय फायदा झाला. त्यामुळे RBI थोडा वेळ थांबण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याची घोषणा केली आहे.
तसेच सध्याच्या जागतिक आर्थिक घडामोडी पाहता, काही अर्थशास्त्रज्ञ मात्र वेगळं मत मांडतात. ते म्हणतात, अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. औद्योगिक उत्पादन वाढीचा दर फक्त 1.5% राहिला आहे – जो की मागच्या 10 महिन्यांतील सगळ्यात कमी आहे.
RBI दर कपात करेल की नाही यावर अजून स्पष्टता नाही. पण काही अर्थतज्ज्ञांची अपेक्षा आहे की यावेळी RBI व्याजदर जैसे थे ठेवेल आणि पुढील निर्णयासाठी दरवाजे उघडे ठेवेल. RBI ऑक्टोबरमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची शेवटची कपात करू शकते.
थोडक्यात सांगायचं झालं तर RBI पुढील आठवड्यात दर कपात न करता वेट अँड वॉच’ भूमिका घेऊ शकते. मात्र महागाईचा कल आणि सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी यामुळे दर कपातीचा निर्णय घेतला गेला तर सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
