ऑगस्टची सुरुवात उकाड्यानं? राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांत मात्र मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

1 min read

पुणे दि.४:- ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरीहून अधिक असेल असा इशारा आयएमडीनं दिला खरा. मात्र या महिन्याची सुरुवात मात्र तापमानवाढीनं झाली आहे. राज्याच्या कोकण, मुंबई शहर आणि उपनगरांसह इतर बहुतांश भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असतानाच सूर्यकिरणं आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळालं. तर, कुठं श्रावणसरींनी हवामानातील गारवा कमी केला. मात्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा पट्टा यास अपवाद ठरत आहे. कोकण, मुंबईला हवामान विभागानं पावसाचा कोणताही इशारा दिलेला नसला तरीसुद्धा विदर्भातील पूर्वेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील दक्षिणेक़डे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, राज्यात प्रामुख्यानं सोलापूर, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर, उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी आणि अंशत: ढगाळ वातावरण असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!