पांगरी माथा येथे दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

ओतूर, दि.४ – येथील पोलीस स्टेशन हद्दीतील ओतूर ते जुन्नर रोडवरील पांगरी माथा येथे शनिवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. रजत राजेंद्र शिंदे (वय २५, रा. शिरोली बुद्रुक) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. रजत हा हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो गाडी (एमएच १४ ईबी १८३५) घेऊन बनकर फाट्याकडून जुन्नरच्या दिशेने जात असताना समोरून एक युवक हिरो होंडा सीडी डिलक्स गाडी (एमपी ४६ एमएक्स ३७६५) विरुद्ध दिशेने येत असताना दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला आहे.हा अपघात इतका भीषण होता की, रजत यास ओतूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर दुसरा दुचाकीस्वार रुग्णालयात उपचार घेत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!