जुन्नरची सिद्धी कोरडे नीट पीजी एमडी एंट्रन्स एक्झाम परीक्षेत महाराष्ट्रात पहिली; देशात १५ वा क्रमांक
1 min read
आणे दि.१:- जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावातील प्रथित यश कुटुंबा कैलासवासी तानाजी शंकर कोरडे यांची मुलगी डॉ. सिद्धी कोरडे (वय २४) यांनी नीट पीजी एमडी एंट्रन्स एक्झाम परीक्षेत संपूर्ण भारतातून १५ वा व महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून दैदीप्यमान यश संपादित केले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील डॉक्टर सिद्धी या बोरी बुद्रुक ता. जुन्नर जिल्हा पुणे या गावची रहिवासी असून वडील तानाजी कोरडे हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते परंतु हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आजोबा शंकर कोरडे व आई उषा कोरडे यांचे खांद्यावर पडली.
पाणी जार चा व्यवसाय सांभाळत असताना मुलांना चांगले व उच्च शिक्षण द्यायचे हा जणू चंगच उषा कोरडे यांनी बांधला होता. त्याचेच फळ म्हणून डॉ. सिद्धी कोरडे यांनी हे यश संपादित केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून असलेल्या सिद्धी कोरडे यांनी हे दैदीप्यमान यश मिळवले हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
त्यांचा भाऊ शुभम कोरडे हा देखील तिच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन एक प्रकारे तिची सपोर्ट सिस्टीम बनून तिच्या सतत पाठीशी उभा आहे खरोखरच आम्हा ग्रामस्थांना डॉ. सिद्धी हिचा अभिमान वाटतो. तिला तिच्या पुढील कार्यकाळासाठी व शिक्षणासाठी खूप सार्या शुभेच्छा या शिक्षणाच्या कामी डॉक्टर सिद्धी यांच्याशी संपर्क केला.
असता त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्याचप्रमाणे डॉक्टर अजित पाटील मुंबई व त्यांचे शिक्षा गुरु प्रेम भक्ती रस माताजी व शामलीला प्रभुजी, आध्यात्मिक गुरू परम पुज्य राधानाथ स्वामी व आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद यांचे आशीर्वादाने हे शक्य झाल्याचे
सिद्धी हिने सांगितले. खरोखरच डॉ. सिद्धी यांचे हे यश गाव खेड्यातील सर्वसामान्य मुलांसाठी एक आगळावेगळा प्रेरणा स्रोत असल्याचे जाणवते असे त्यांचे काका संदीप कोरडे यांनी सांगितले.
