कृषीमंत्री माणिक कोकाटे यांचे खाते अखेर बदलले
1 min read
मुंबई दि.१:- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विधीमंडळ सभागृहात रम्मी खेळणं अखेर भोवलं आहे. त्यांना मंत्रिपदावरून जरी हटवण्यात आलं नसल तरी त्यांचे खाते बदलण्यात आलं आहे. त्यांच्या कडे आता क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे.
कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर भरणे यांच्याकडे आधी असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे.माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळ सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता.
त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू होता. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती.
माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो,अशी चर्चा सुरू होती, मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडे असलेलं खातं बदलण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाची चर्चा सुरू होती.
आता त्यांच्याकडील खाते हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटे यांनी या आधीही शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली होती.
ती त्यांना भोवण्याची चिन्हं होती. पण सध्या तरी त्यांचे फक्त खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात शेतकरी संकटात असतानाही कृषिमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळताना दिसले.असं असतानाही त्यांचा राजीनाम न घेता.
फक्त त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. खाते बदलले ही काही कारवाई आहे का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला. आता रमी खेळाला राज्य खेळाचा दर्जा द्या अशी खोचक मागणी त्यांनी केली. 
