विशाल परिवारात वृक्षरोप वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा 

1 min read

आळेफाटा दि.१:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे येथे दिनांक 29 जुलै मंगळवार रोजी “एक पेड मा के नाम” हा वृक्ष वाटपाचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण काळाची गरज आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी ची जाणीव या मूल्यांची पेरणी करणारा ठरला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रमेश खरमाळे शिवनेर भूषण माजी सैनिक व वनरक्षक सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नर, समीर इंगळे वनरक्षक अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नर, मनीषा काळे वनपाल, संतोष आगरकर वनपाल व शौकत अली मोमीन वनरक्षक, तसेच विक्रांत काळे विश्वस्त विशाल जुन्नर सेवा मंडळ, डॉ. दुष्यंत गायकवाड विशेष कार्यकारी अधिकारी विशाल जुन्नर सेवा मंडळ, डॉ. सुरेश जाधव प्राचार्य विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे, डॉ. रूपाली हांडे प्राचार्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळे, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये शिवनेर भूषण पुरस्कार प्राप्त रमेश खरमाळे यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडी संदर्भात जागरूक केले तसेच मनीषा काळे यांनी नागपंचमी निमित्ताने इको फ्रेंडली सण कसे साजरे करावे याबद्दल माहिती दिली तसेच काळे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम समन्वयक म्हणून अक्षदा वाघ तसेच धनश्री गीते यांनी कामकाज पाहिले तसेच कार्यक्रमाचे आभार श्रीम. तृप्ती भुजबळ यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!