सर्व एसटी बसेसला भिंगारमध्ये थांबा; नियंत्रण विभागाचे आदेश
1 min read
अहिल्यानगर दि.३१:- भिंगार शहरातून जाणाऱ्या सर्व एसटी बस गाड्यांना भिंगारमध्ये थांबा देण्याचे आदेश विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच भिंगार येथील बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी विभागीय स्थापत्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.
असल्याचे लेखी पत्र अहिल्यानगर विभाग नियंत्रक अधिकारी यांनी भिंगार भाजापाचे मंडल अध्यक्ष सचिन जाधव यांना दिले आहे. भाजपाच्या भिंगार मंडलाच्या पाठपुराव्यास यश आले असून सर्व एसटी गाड्या आता भिंगार स्थानकात थांबत आहेत.
भिंगार भाजप मंडलाच्या वतीने भिंगार शहरातून जाणाऱ्या एसटी बस गाड्या भिंगारमध्ये थांबत नसल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत अहिल्यानगर विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनाची दखल घेऊन राज्य परिवहन विभाग नियंत्रक अधिकारी यांनी भिंगार मार्गे जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या भिंगार बसस्थानकात जाऊन प्रवासी चढ-उतार करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
