रायगडावर एक दिवसाचे संसदेचे अधिवेशन घ्यावे – निलेश लंके

1 min read

अहिल्यानगर दि.३१:- संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेचा ऐतिहासिक संदर्भ देत, रायगड किल्ल्यावर एक दिवसाचे संसदेचे अधिवेशन आयोजित करण्याची आग्रही मागणी केली.खासदार लंके म्हणाले, ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. हा क्षण केवळ स्वराज्याची स्थापना नव्हे, तर लोकशाही मूल्यांची मूळ जडणघडण होता.जेव्हा संपूर्ण जग हुकूमशाहीत बुडालं होतं, तेव्हा शिवराज्य लोकशाहीचा दीप घेऊन उभं होतं. शिवाजी महाराजांच्या या अद्वितीय वैचारिक वारशाचा गौरव करण्यासाठी, आणि आजच्या लोकशाही व्यवस्थेला त्या मुळांशी पुन्हा जोडण्यासाठी, रायगड किल्ल्यावर एक विशेष संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी ही केवळ ऐतिहासिक न्याय नाही, तर प्रेरणादायीही ठरेल, असे लंके यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!