बेल्हे जिल्हा परिषद शाळेत विविध फळझाडांची लागवड

1 min read

बेल्हे दि.३१:- बेल्हेश्वर आशीर्वाद फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष असून या पूर्वी शाळेमध्ये पळस ,बहावा, पारिजातक ,अर्जुन, ताम्हण अशा विविध झाडांची लागवड करण्यात आलेली आहे.यावर्षी त्यामध्ये भर घालत चिकू ,फणस, जांभूळ अशा उपयुक्त फळझाडांची लागवड शाळेत करण्यात आली. या निमित्ताने बिल्लेश्वर आशीर्वाद फाउंडेशनचे संयोजक सन्मा. सुनील चौरे सर ,किशोर भाऊ अभंग, तुषार डावखर यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न केला. यासाठी स्वप्निल भंडारी यांचे सहकार्य लाभले.आशीर्वाद फाउंडेशन ची संपूर्ण टीम सातत्याने प्रयत्न करत आहेत. भेटीअंतर्गत शाळेमध्ये सुरू असलेल्या इतर उपक्रमांविषयी चर्चा केली. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एआय आणि रोबोटिक तंत्रज्ञान सुरू करण्याबाबत मनोदय व्यक्त व्यक्त केला.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीतम मुंजाळ, सदस्य ईश्वर पिंगट ,विलास पिंगट यांनी उपस्थित राहून आशीर्वाद फाउंडेशन च्या कार्याबद्दल सर्वांचा सन्मान करण्यात आला. उपशिक्षक हरिदास घोडे ,संतोष डुकरे व सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.मुख्याध्यापक मीरा बेलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!