श्री.जे. आर गुंजाळ इंग्लिश मीडियम चा १०० टक्के निकाल

1 min read

आळेफाटा दि.२:- ओम चैतन्य फाउंडेशन संचलित श्री.जे. आर गुंजाळ इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज आळेफाटा (तालुका जुन्नर) चा १० वी चा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक ठीकेकर मयांक प्रकाश (90.20 टक्के), द्वितीय क्रमांक मलिक आफिया वसिउल्ला (88.80 टक्के) तर तृतीय क्रमांक शिंगोटे ओम रोहिदास (88.40 टक्के )व राऊत अनाया भरत(88.40%)याने पटकवला आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप गुंजाळ व सेक्रेटरी मीना गुंजाळ व प्रभारी प्राचार्य विठ्ठल म्हस्के शाळेच्या शिक्षक पालकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे