जुन्नर तालुक्यातील ३८ शाळांचा निकाल १०० टक्के; तालुक्याचा निकाल ९६.९४ टक्के

1 min read

जुन्नर दि. २ :-जुन्नर तालुक्यातील तब्बल ३८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून तालु्यातील ९० शाळांमधील ५१६८ या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ५०१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील १६८२ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तर प्रथम श्रेणीत १८२७ व द्वितीय श्रेणीत ११८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वाघदरे यांनी दिली आहे. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

तालुक्यातील १०० टक्के निकाल लागलेल्या शाळा पढीलप्रमाणे- अंजुमन हायस्कूल (जुन्नर), श्री छत्रपती हायस्कूल (येणेरे), न्यू इंग्लिश स्कूल ( शिरोली बु.), श्री विघ्नहर विद्यालय (ओझर), शिवनेरी विद्यालय (धोलवड ), आणे माळशेज हायस्कूल (मढ), श्री गाडगे महाराज विद्यालय (ओतूर), सरस्वती विद्यालय ( उदापूर), आश्रमशाळा अंजनावळे, अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम (नारायणगांव), न्यू इंग्लिश स्कूल (खामुंडी), सावळाराम बुवा दांगट विद्यालय सोनावळे,

गुरुवर्य गोविंददेव प्रशाला (बोरी), विर सावरकर विद्यालय (बल्लाळवाडी), ज्ञानदा कन्या विद्यालय (नारायणगांव), शारदाबाई पवार विद्यालय (आंबे गव्हाण), ज्ञानदा माध्यमिक विद्यालय (मंगरूळ), शितळेश्वर विद्यालय (सितेवाडी), समर्थ मधुकरराव विद्यालय (चिंचोली), न्यू इंग्लिश स्कूल (हिवरे खुर्द), कुलस्वामी विद्यामंदिर (वडज),न्यू इंग्लिश स्कूल (धामणखेल), न्यू इंग्लिश स्कूल (करंजाळे), न्यू इंग्लिश स्कूल (शिरोली बु.), न्यू इंग्लिश स्कूल (आंबोली), शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय (आळेफाटा),

श्री जगदंबा विद्यालय (जाधववाडी), अजितदादा पवार हायस्कूल (खडकुंबे), जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल (आळेफाटा), शेठ नेनसुख मुथा स्कुल (जुन्नर),शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम (जुन्नर), कर्पदिकेश्वर इंग्लिश स्कूल (ओतूर), हांडे देशमुख हायटेक स्कूल (आळेफाटा), विद्या निकेतन हायस्कूल (साकोरी), रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूल (शिरोली), हिरा इंग्लिश मिडीयम (खानापूर), जयहिंद इंटरनॅशनल स्कूल

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे