समर्थ अभियांत्रिकी च्या ८ विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड
1 min read
बेल्हे दि.२ :- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथील अभियांत्रिकी च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ८ विद्यार्थ्यांची ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राइव्ह मार्फत मुंबई येथील “द किला स्ट्रक्चरल रिपेअर्स अँड कोटिंग” व “जय मातादी कंपनी अहमदनगर” या कंपन्यामध्ये निवड झाल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.प्रविण सातपुते यांनी दिली.औद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांची संख्या आणि तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान,संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,मुख्य विषयाबाबतचे सखोल ज्ञान.
प्रात्यक्षिक ज्ञान व व्यावहारिक दृष्टिकोन या सर्व बाबी विकसित करण्याचे काम संस्थेचा ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग करत असल्याने त्यामार्फत या विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे सिव्हिल विभागाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.अमोल भोर यांनी सांगितले.समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शिकत असलेल्या आकाश आंधळे,संदिप थोरात,तेजस भागवत,ऋतिक माळी,भाऊसाहेब डोंगरे,सिद्धेश फाकटकर,आकाश पिंगळे,मयूर आल्हाट या विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनियर म्हणून “द किला स्ट्रक्चरल रिपेअर्स अँड कोटिंग” आणि “जय मातादी कंपनी अहमदनगर” या कंपनी मध्ये नुकतीच निवड करण्यात आली.
निवड झाल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.