अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ विशेष मोहीम
1 min read
अहिल्यानगर दि.२३:- सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तडजोडसक्षम दिवाणी व फौजदारी प्रकरणांसाठी विशेष मध्यस्थी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत न्यायालयातील प्रलंबित तडजोडसक्षम प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद, मोटार अपघात, नुकसानभरपाई, चेक बाउन्स प्रकरणे,
वाटपाचे दावे व वाणिज्यिक दावे यांचा समावेश असून, या प्रकरणांमध्ये मध्यस्थ प्रक्रियेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दिली.सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ ही मोहीम जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये १ जुलै २०२५ पासून पुढील ९० दिवसांसाठी राबविण्यात येत आहे.
