तीन महिन्याचा गर्भ असलेल्या महिलेची गर्भ पिशवी फुटली; डॉक्टर धांडे यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

1 min read

आळेफाटा दि.२२:- धांडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आळेफाटा (ता.जुन्नर) येथे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र धांडे यांनी पोटात तीन महिन्याचा गर्भ असलेल्या गर्भाशय फुटलेल्या महिले वर यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेला जीवदान दिले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, ओतूर येथील २६ वर्षीय महिलेला तुमचे पेशंट सिरियस असून मुंबई किंवा पुणे येथे नेण्याचा सल्ला बरेच डॉक्टरांनी रुग्ण महिलेच्या नातेवाईकांना दिला होता. डॉक्टर धांडे हे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीतून करण्यामध्ये प्रख्यात असल्याने त्यांच्याकडे महिलेच्या नातेवाईकांनी तपासणी केली. सोनोग्राफी व इतर तपासण्या करून महिलेला दोन गर्भपिशव्या असून एक गर्भपिशवीत तीन महिन्याचा गर्भ आहे. ती पिशवी फुटलेल्या अवस्थेत दिसली. डॉ .धांडे यांनी दुर्बिणीतून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. सुमारे दीड तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये सदर महिलेला पाच बाटल्या ब्लड तसेच पाच बाटल्या प्लाजमाच्या लागल्या. ऑपरेशन यशस्वी पूर्ण करून महिलेला 72 तासांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. सदर महिला पुन्हा गर्भधारणा करण्यास सक्षम असल्याचं देखील ड्रॅक्टर धांडे यांनी सांगितले.अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टर धांडे यांचे आभार मानले. डॉ. राजेंद्र धांडे हे प्रचंड अनुभवी प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूती तज्ञ असून काही वेळातच पेशंटचा त्रास कमी करून अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करतात. त्यांनी आजपर्यंत हजारो शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यामध्ये अवघड प्रसूती, लॅप्रोस्कोपी, अत्याधुनिक दुर्बिणीतून पोटाच्या गाठीच्या शस्त्रक्रिया, अंडाशय व गर्भाशयाच्या गाठीच्या शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे कॅन्सर व छातीतील गाठीचे ऑपरेशन, व्यंधत्व चिकित्सा, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, थायरॉईडचे ऑपरेशन, अशांचा समावेश आहे. त्यामुळे अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया साठी राज्यभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!