सरदार पटेल हायस्कूल येथे देशी जातींचे वृक्षारोपण

1 min read

आणे दि.२३:- महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सरदार पटेल हायस्कूल आणे येथे देशी जातींचे वृक्षारोपण करत गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियंका प्रशांत दाते यांच्या हस्ते संपन्न झाले. उपस्थित सर्वांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, पी.डी.ई.ए.चे अध्यक्ष, अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रांगोळी व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक, धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली. याप्रसंगी आणे गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबाजी शिंदे, राजु आहेर, प्रशांत दाते, प्रदिप आहेर, ॲड.संतोष आहेर, अशोक दाते, बाळासाहेब दाते, जयराम दाते, आरिफ इनामदार, डॉ.बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन रविंद्र जाधव यांनी केले तर आभार विजय भणगे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!